Baramati News | बारामती, (पुणे) : जुन्या वादातून तिघांनी चुलता-पुतण्यावर चाकू, तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना निरावागज (ता. बारामती) येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार भरत धायगुडे, अविष्कार भरत धायगुडे आणि भरत बापूराव धायगुडे (रा. धायगुडेवस्ती. २४ फाटा, निरावागज, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच आरोपींना अटक केली आहे. याबाबत मोहन धोंडीबा धायगुडे (वय – ६२) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात जुना वाद आहे. या वादातून अविष्कार याने त्याच्या ताब्यातील बुलेट गाडी फिर्यादीच्या मोटारसायकलला आडवी मारून त्यांना रस्तात अडवत शिवीगाळ केली. भरत धायगुडे यांनी त्यांच्या बुलेटवरून येत फिर्यादीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते खाली पडले असता ओंकार आणि अविष्कार यांनी त्यांना मारण्यास सुरुवात केली. ते उठण्याचा प्रयत्न करत असतान ओंकार याने चाकूने फिर्यादीच्या गळ्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने वार केला.
फिर्यादीने डाव्या हाताने तो वार चुकवण्याचा प्रयत्न केला असता करंगळीशेजारील बोटावर चाकू लागून बोटाचा काही भाग जागीच तुटून पडला. भरत यांनी तेथे येत दोघा मुलांना याला मारा, आज खूप दिवसांतून सापडला आहे. याची विकेटच काढा, असे म्हणत हाताने बेदम मारहाण केली.
दरम्यान, फिर्यादीचा पुतण्या रणजीत याने चुलत्यांना का मारले अशी विचारणा केली असता त्यालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने डाव्या पायाच्या मांडीवर वार करून जखमी करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News | सावित्रीबाई फुले विद्यापीठात नाना पटोले यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली