Baramati News : पोलीस कर्मचाऱ्यासह सराफाने महिलेवर बलात्कार करून, इतर ६ जणांची फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना बारामतीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.(Baramati News)
८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिडीत महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवाजी राजाराम निकम, भरत ओसवाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम, समीर शेख व दोन अनोळखी व्यक्तींवर फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी शिवाजी निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत.(Baramati News)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिडीत महिलेकडून ८० तोळे सोने घेतले. या सोन्याच्या बदल्यात महिलेला केवळ २० लाख रुपये देऊन, उर्वरित सोन्याचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली.(Baramati News) महिलेने उर्वरित पैशांची मागणी केल्यानंतर, सोने परत देतो, असे सांगत तिला बारामती येथील शक्ती प्लाझाजवळील खाटीक गल्ली येथे बोलावून घतले. संबंधित महिला तेथे पोहोचल्यावर तिच्यावर बलात्कार केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली.
दरम्यान, कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी फियार्दीस गरुड बाग येथे बोलावून, जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.(Baramati News)