Baramati News : बारामती (पुणे) : पेट्रोलपंपाची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या पंप व्यवस्थापकाला अडवून अज्ञातांनी पिस्तुलाचा धाक दाखवून रोकड लुटीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. ०७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बारामती शहरात हि घटना घडली आहे. (Baramati News)
रक्कम असणारी बॅग हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न
या घटनेत पंपाचे व्यवस्थापक मयुर शिंदे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले. शिंदे यांनी धाडसाने विरोध केल्याने दोघा चोरट्यांवर ही रोकड न घेताच तेथून पसार होण्याची वेळ आली आहे. (Baramati News)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे मयूर शिंदे यांनी पेट्रोलपंपावरील रक्कम घेत ती भरण्यासाठी ते दुचाकीवरून शहरातील बँकेच्या दिशेने निघाले होते. यावेळी अचानक स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यांच्याकडील रक्कम असणारी बॅग हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यवस्थापक शिंदे यांनी ही बॅग धाडसाने पोटाखाली दाबून ठेवली. (Baramati News)
यावेळी चोरट्यांनी त्यांना पिस्तुल रोखत धमकाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील पैशांची बॅग शिंदे यांनी सोडली नाही. त्यामुळे त्यांना पिस्तुलाच्या मुठीने मारहाण करण्यात आली. त्यात शिंदे गंभीर जखमी झाले. त्यावेळी येथील मोहिते वस्तीवरील मुले धावून आली. यावेळी दुचाकीवरील दोघे आणि पुढे दुचाकीवर थांबलेले दोघेजण पसार झाले. (Baramati News)
यावेळी उपस्थित युवकांनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने या ठीकाणी पोहचले.पथकाने घटनास्थळाची पाहणी करीत घटनेची माहिती घेतली आहे.