Baramati Crime | बारामती, (पुणे) : तुमच्या घरकुलाचे काम करून देतो, असे म्हणत ग्रामसेवकाने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामसेवकाविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव सालगुडे असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते सिद्धेश्वर निंबोडी येथे कार्यरत आहेत. याबाबत पीडित महिलेने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील आहे. बारामतीत ती काम करत उपजीविका करते. गावातील घरकुलासंबंधी तिचे सालगुडे यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. मंगळवारी (ता. २५) ती मांढरदेवीला गेली असताना तिला सालगुडे यांचा फोन आला.
मला तुम्हाला भेटायचे आहे, असे त्याने सांगितले. मी सध्या बाहेरगावी असून, रात्रपाळीला कामाला जाणार आहे, असे महिलेने त्याला सांगितले. मी तुम्हाला कामावर सोडतो, असे तो म्हणाला. संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महिला कामावर जाण्यासाठी सायली हिल परिसरात थांबली असताना सालगुडे तेथे आले.
दरम्याण, तिला मोटारसायकलवर बसवले. मला कामाला जायला उशीर झाला आहे, पट्कन सोडवा, अशी मागणी तिने केली. त्याने तिच्या कामाच्या ठिकाणाच्या अलीकडेच दुचाकी थांबवली. दुचाकीवरून खाली उतरत तिला जवळ ओढत तिचा विनयभंग केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati News : कालीचरण महाराजांनी बारामतीत केलेल्या ”त्या” वक्तव्याबाबत गुन्हा दाखल