Baramati Crime | बारामती : पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने 11 जणांवर हल्ला केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा बारामती मधून भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षाच्या चिमुकलीवर दहा ते बारा कुत्र्यांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. कुत्र्यांच्या या हल्ल्यात चिमुकली जखमी झाली आहे. शहरातील कॅनॉल रोडवरील खत्री इस्टेट मध्ये आज रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.
अश्वी जगदाळे असे हल्ला झालेल्या चिकमुलीचे नाव आहे.
बारामती मधील खत्री इस्टेट मध्ये जगदाळे कुंटुंबातील ही मुलगी सकाळी घरात खेळत होती. यावेळी खेळता खेळता ती घरा बाहेर आली. यावेळी अचानक दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी अश्वीवर हल्ला चढवला. दरम्यान घाबरलेली अश्वी मोठ्याने ओरडली.
तिचा ओरडण्याचा आवाज ऐकताच कुटुंबियांनी तात्काळ धाव घेतली व तिला सुखरूप वाचवले. मात्र यात ती जखमी झाली. जखमी अश्वीला तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार केले.
या घटनेनंतर शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहर व परिसरा भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणीहून हल्ला झाल्याच्या घटना समोर येताना दिसून येत आहेत. यावर आवर घालण्याची मागणी स्थानिकांकडून प्रशासनाला केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!