पुणे : जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मोक्क्यातील गुन्ह्यात एकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयातील जस्टीस अनुजा प्रभु देसाई यांचे खंडपीठाने हा आदेश दिला आहे. आरोपीवर शिक्रापूर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती.
सचिन दिलीप राक्षे असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मोहसीन तांबोळी यांनी फिर्याद दिली होती. राक्षे याने अॅड. अनिकेत उज्वल निक्कम व अँड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० नोव्हेंबर २०१७ साली रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस मध्ये काम करणारे मोहसीन तांबोळी हे कंपनीचे जमा केलेले १५ लाख ३१३ रुपये मोटरसायकल वरून बँकेत जमा करणेसाठी घेऊन चालले होते. शिरूर जवळ पुणे नगर हायवे वर दोन आरोपींनि फिर्यादीच्या मोटरसायकलला आरोपींची मोटरसायकल आडवी लावून थांबण्यास भाग पाडले. व फिर्यादीच्या मोटरसायकलला अडकवलेली पैश्यांची बॅग ओढण घेण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादी याने त्यांना प्रतिकार केला म्हणून दोघांपैकी एकाने फिर्यादिच्या छातीवर चाकूने वार करून फिर्यादिस जखमी करून पैसे घेऊन पळून गेले होते. अशी तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली होती.
दाखल गुन्ह्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी गुन्ह्याच्या तापसमध्ये एकूण ९ आरोपीना अटक करून गुन्ह्यात कलमवाढ करून मोक्का कायद्याचा अंतर्भाव केला होता. त्या नंतर आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन दिलीप राक्षे याने मुंबई उच्च न्यायालयात अँड. अनिकेत उज्वल निक्कम व अँड. नितीन भालेराव यांच्या द्वारे जमिनाचा अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, आरोपी मागील ६ वर्षांपासून कारागृहात बंदिस्त असून केसमध्ये कुठल्याहि प्रकारची प्रगती झाली नसल्याबाबत तसेच मोक्का कायद्याबाबत आरोपीचे वकिलांनी युक्तिवाद केला त्यानंतर आरोपींचे वकिलांचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयातील जस्टीस अनुजा प्रभु देसाई यांचे खंडपीठाने आरोपीस जमिनावर सोडण्याचे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील अँड. नितीन भालेराव यांनी दिली आहे.