Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र – ओडिशा, गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघांना विजेतेपद

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 November 2022, 20:04

पुणे : मुलींच्या गटातून महाराष्ट्र – ओडीसा संयुक्त संघाने तर, मुलांच्या गटातून गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व जिल्हा रोलबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आरएलएमएसएसचे विंग कमांडर एम. याग्नावनम, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष अमोल काजळेपाटील, प्रा. प्रणेती लवंगे, आरएलएमएसएसचे प्रशिक्षक गजानन माळी, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००१६ साली मांडली.या अंतर्गत विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात व त्यात २/३ राज्यातील खेळाडूंची एक टीम तयार केली जाते आणि अश्याच पद्धतीने तयार केलेल्या दुसऱ्या टीम सोबत खेळ रंगतो असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

 

याद्वारे विविध राज्यातील खेळाडुंमध्ये परस्पर स्नेह वृद्धिंगत होतो व देशभरातील सर्व खेळाडू एकमेकांशी जोडले जातात. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून कोण जिंकले यापेक्षा खेळ भावना जिंकली आणि एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मूर्त स्वरूपात आल्याचे समाधान वाटते असेही खर्डेकर म्हणाले. याच उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा रोलबॉल संघटनेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुलीच्या गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र – ओडिसा संघाने मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संघाला ५-३ असे पराभूत केले. मध्यंतराला महाराष्ट्र – ओडीसा संघाने ४-१ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्र – ओडीसा संघाकडून महेक राऊतने ३ (२.३०, ४.४०, ९.१८ मिनिटे) तर श्रुती भगत (५.४० मिनिटे) व वैभवी मुदगल (२९.४५ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संघाकडून अश्विनी बनोलीया (२.०१ मिनिट), वर्निका उपाध्याय (२५.३० मिनिटे) व खुशी वानखेडे (२८.२६ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मुलांच्या अंतिम फेरीत गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाने मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड प्रदेशाच्या संयुक्त संघाला ७-४ असे पराभूत केले. गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाने मध्यंतराला ५-१ अशी आघाडी घेतली होती. गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाकडून झंकृत अघेराने ५ (५.०७, ७.४५, १४.०६, २७.११, २८.१३ मिनिटे) तर यश रसिया (१.५१ मिनिटे) व भारत सिन्हाने (८.४३ मिनिटे) प्रत्येकी एक गोल केला. मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संघाकडून गुरुवचन सिंग (७.०७ मिनिटे), दीपन सिंग (१८.४२ मिनिटे), सुजय कुमार (२०.१० मिनिटे) व अभिषेक कुमारने (२२.३६ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

तत्पूर्वी मुलांच्या गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीत मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संयुक्त संघाने उत्तरप्रदेश-अरुणाचल प्रदेश – मेघालयच्या संयुक्त संघाला २२-७ असे एकतर्फी पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्याच गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुजरात – छत्तीसगड संघाने महाराष्ट्र – ओडीसा संघाला ११-९ असे पराभूत करताना अंतिम फेरी गाठली होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Breaking News : सोरतापवाडी हद्दीत पुणे - सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात उरुळी देवाची येथील १८ वर्षीय युवक ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.