Aware Murder Case | पुणे (तळेगाव दाभाडे ) : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेळके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. बदनामीसाठी आपल्याला या गुन्ह्यात गोवले असल्याचे आमदार शेळके म्हणाले आहेत.
शेळके यांनी पुढे येत पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी ते म्हणाले, किशोर आवारे आणि आमच्यामध्ये राजकीय मतभेद होते, मात्र मतभेद नव्हते. जे काही सत्य आहे ते पोलीस चौकशीत बाहेर येईल. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. घरातील व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयाची भावना काय असते ती समजून आहे. परंतु तक्रार दाखल करण्यामागे याचे सुत्राधार कोण आहेत. याचा पुढील काळात शोध घेण्याचा प्रयत्न करू.
मावळच्या जनतेने मला विकासासाठी निवडून दिले आहे. अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण माझ्याकडून होणार नाही, राजकारणातून बाजूला होण्याचा प्रश्न असेल तर आज होईन. परंतु बदनाम करून तुम्ही मला आलिप्त करू शकत नाही. असा ईशाराची शेळके यांनी दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे सुनील शेळके यांनी म्हंटल आहे.
काय आहे प्रकरण…?
जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झालाय. गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News | निमगाव म्हाळुंगी परिसरातून पाच किलो गांजा जप्त ; एकाला बेड्या, तर एकजण फरार
Pune Traffic | वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ भागातील वाहतूकीत तात्पुरते बदल