पुणे : मोक्का कायद्यांतर्गत शिक्षा भोगत असलेला आरोपी नाना गायकवाड (Accused Nana Gaikwad) याच्यावर पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याने हल्ला केला (attacked by an inmate in Pune’s) होता. त्याच पद्धतीने चौघांनी मिळून या कैद्यावर हल्ला केल्याची घटना (prisoner together.) समोर आली आहे. हा प्रकार येरवडा (Yerawada Jail) कारागृहातील टिळक मंडल कार्यालयाच्या (Tilak Mandal Office) मुख्य फाटकाजवळ मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.या हल्ल्यात कैदी जखमी झाला (prisoner has been injured) आहे. यावरून पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
या हल्ल्याप्रकरणी तुरुंगाधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश बळीराम दयाळु असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. अस्लम बशीर मुजावर, सिद्धार्थ अंकुश यमपुरे, अजय विजय पायगुडे, सौरभ गणेश सावळे असे आरोपींची नावे आहेत. यांच्याविरुद्ध येरवडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यावर 2021 मध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सूनेला शारीरिक आणि मानसिक त्रास देणे तसेच जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
त्यांच्यावर बेनामी जमीन बळकवल्याचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे 100 कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती सापडली होती. तो कारागृहात असताना ३फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास नाना गायकवाड खोलीसमोर खुर्चीवर बसला होता. त्यावेळी सुरेश दयाळु याने लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने गायकवाड याच्या उजव्या गालावर वार केला होता. येरवडा पोलिसांनी सुरेश दयाळु याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, आता सुरेशवर हल्ला करण्यात आला. आरोपी अस्लम याच्याबरोबर सुरेश याची पूर्वी भांडणे झाली होती. अस्लम याने इतर आरोपींशी संगनमत करुन सुरेश याला हाताने धक्काबुक्की केली. बशीर मुजावर याने भत्ता पेटीच्या तुटलेल्या पत्र्याच्या तुकड्याने सुरेश याला मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..