सातारा : प्रेम हे आंधळं असतं पण प्रेमिकांनी डोळे उघडले की, शेवट चांगला होत नाही. याची अनेकदा प्रचिती आली आहे. खटाव तालुक्यातील वांझोळी गावात नात्यातील दोघांचे प्रेम होते. दोघांचाही त्यामध्ये बळी पडून होत्याचे नव्हते झाले आहे. नवविवाहीता मुलगी व अविवाहित मुलाचा शेवट अखेर झाला आहे. या घटनेची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली आहे.
खटाव तालुक्यात वांझोळी गावात रविवारी रात्रीच्या वेळी दुर्दैवी घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून आरोपीने आत्महत्या केली आहे. सदरच्या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
या घटनेत नवविवाहित स्नेहल वैभव माळी (वय- २२, रा. शामगाव, ता. कराड) यांचा खून झाला आहे. तर खून करणारा आरोपी दत्तात्रय सुरेश माळी (वय- २७, रा. वांझोळी, ता. खटाव) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दत्तात्रय माळी याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, तसेच मोबाईलवर स्टेटसलाही ही चिठ्ठी ठेवली होती.दोघे नातेवाईक होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वांझोळी येथील दत्तात्रय माळी व स्नेहल यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी स्नेहल हिचा शामगाव येथील युवकाशी विवाह झाला होता. शामगाव हे तिचे सासर असून, दोन महिन्यांनंतर ती शनिवारी आपल्या माहेरी वांझोळीत गेली होती. त्यावेळी सदरची घटना घडली. या घटनेची नोंद खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्यात झाली आहे.अधिक तपास स पो नि दत्तात्रय दराडे करीत आहेत.