Arrested | लोणी काळभोर, (पुणे) : पुणे शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून मागील सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा यूनिट ६ च्या पोलिसांनी वाघोली (ता. हवेली) परिसरातून जेरबंद ( Arrested ) केले आहे.
योगेश उर्फ सॅम ऊर्फ बाबा जगदीश सोनवणे (वय – २३, रा. घर नंबर ७३४, ए डी कँप चौक, नाना पेठ, पुणे) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी शिताफीने सापळा रचून आरोपी योगेश सोनवणे याला घेतले ताब्यात …
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २४) युनिट सहाचे पथक वाघोली परिसरात गस्त घालीत असताना पोलीस शिपाई ऋषीकेश ताकवणे यांना खबऱ्याकडुन माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी योगेश उर्फ सॅम ऊर्फ बाबा जगदीश सोनवणे विविध गुन्ह्यातील फरार आरोपी असून वाघोली येथील चोखी धानीरोड वरील आर के हॉटेल जवळील मोकळ्या मैदानात थांबलेला आहे.
त्यानुसार, पोलिसांनी शिताफीने सापळा रचून आरोपी योगेश सोनवणे याला ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी सोनवणे याच्यावर या पुर्वी पुणे शहरातील उत्तमनगर, वारजे माळवाडी, येरवडा, समर्थ, कोंढवा, विमाननगर, सहकारनगर, भारती विद्यापीठ, कोरेगांव पार्क, खडकी तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील जेजुरी, हवेली या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस नाईक रमेश मेमाने, पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे नितीन धाडगे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…