Arrested | लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर, हडपसरसह जिल्हा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ पेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये फरारी असलेली आरोपीला सोलापूर जिल्ह्यातून खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
बालाजी जयराम वाघमारे, (वय ३२, रा. मु. पो. तुळशी, ता. माढा, जि. सोलापुर) ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ईश्वर आंधळे, नेमनुक खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे शहर, यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १४) परिमंडळ पाचच्या हद्दीत पोलीस शिपाई अमोल पिलाणे व चेतन शिरोळकर गस्त घालीत असताना एका खबऱ्याकडून दोघांना माहिती मिळाली कि, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करून फरार असलेला आरोपी बालाजी वाघमारे हा त्याच्या मूळ गावी तुळशी (सोलापूर) या ठिकाणी लपून बसला आहे.
सदरची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली त्यांनी दिलेल्या आदेशानुसार एक पथक तयार करण्यात आले. त्याप्रमाणे गुन्हे शाखा कंट्रोल रूम येथे रवाना झाले बाबत नोंद करून तुळशी या ठिकाणी राहत घरी असल्याचे मिळून आला त्याला तात्काळ पथकाने ताब्यात घेतले. त्यास नाव पत्ता विचारला असता नाव व पत्ता वरीलप्रमाणे सांगितले.
तेव्हा त्यास स्टाफच्या मदतीने चौकशी कामी खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पुणे शहर येथे आणून त्याचेकडे दाखल गुन्हयांबाबत अधिक चौकशी केली असता हडपसर, लोणी काळभोर, यवत, लोणीकंद, विमाननगरसह विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे केल्याची कबुली पथकाला दिली आहे. तपास पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल