Arrested | पुणे : मुंबई – पुणे महामार्गावर प्रवाश्यांना मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.
अभिषेक लक्ष्मण भोसले (वय २०, रा. निर्मल बैतानी शाळेसमोर, विजयनगर, काळेवाडी, पुणे), विजय सिध्दार्थ म्हस्के (वय २० वर्षे रा. शिंदे यांचे खोलीत, आझाद कॉलनी नं. ३. पाचपीर चौक, काळेवाडी, पुणे), शांतकुमार चंद्रशेखर ददुल (वय-२०, रा. पाडाळे यांचे खोलीत क्रांती चौक, विजयनगर, काळेवाडी, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील स्टाफ खाजगी वाहनाने पुणे- मुंबई महामार्गावर पेट्रोलींग करत असताना एका ग्रे रंगाची नंबरप्लेट नसलेली अॅक्टीव्हा मोपेड गाडीवरुन ट्रिपल सीट जाताना दिसल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र ते न थांबता जावू लागल्याने त्यांचा संशय आला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.
यावेळी त्यांची तपासणी केली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेला लॅपटॉप, गुन्ह्यात वापरलेली अॅक्टीव्हा मोपेड, एक लोखंडी कोयता व ०२ मोबाईल फोन असा एकुण ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीतांना पुढील कार्यवाहीसाठी देहूरोड पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, या टोळीला पकडल्याने संपूर्ण टोळीला पकडण्यात पोलिसांनी मदत होईल तर ही प्रवाशांसाठीही दिलासादायक बातमी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati Crime : बारामतीत २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल..