पुणे : Pune Crime News – पुणे शहरातून संतापजनक बातमी समोर आली आहे. 18 वर्ष पुण न झालेल्या एका मुलीचा विवाह (Arranged marriage of a minor girl) लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विवाहानंतर ही मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान अल्पवयीन असतानाही मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा नोदं करण्यात आला आहे. (Pune Crime News)
कोंढवा पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात पती, सासू- सासरे तसेच मुलीच्या आई-वडिलांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीनेच पोलिसांत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीने सातारा येथे तक्रार दिली होती. परंतु, गुन्हा पुण्यात घडल्याने तो गुन्हा कोंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणात कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत. दरम्यान, आजही अनेक अल्पवयन मुलींचे विवाह लावले जात असल्याचे दिसत आहे. पुण्यात गेल्या वर्षीही असाच एक गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर आता एक गुन्हा नोदं झाला आहे.