Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : वीज समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे – भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 March 2023, 18:52

(Pimpri News) पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याकरिता महावितरण प्रशासनाने पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात. तसेच, प्रस्तावित प्रकल्प आणि विकासकामे मार्गी लावावीत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघात औद्योगिक आणि निवासी अशा दोन्ही पट्टयातील वीज ग्राहकांना नियमितपणे वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून, त्या तुलनेत वीज यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नाही. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही विकासकामे तात्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडे खालीलप्रमाणे कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास सदर कामे मार्गी लावता येतील. असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

प्राधान्याने सफारी पार्क मोशी अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात यावे. त्यामुळे मोशी, डुडुळगांव, आकुर्डी, चिखली, तळवडे या भागातील औद्योगिक व निवासी पट्टयातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. चऱ्होली अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात यावे. ज्यामुळे भोसरी, चऱ्होली, दिघी, धानोरी या भागात पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे. भोसरी गावठाणे येथील नवीन स्विचिंग उपकेंद्र, ओव्हरहेड वीज वाहिन्याचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करणे, तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फिडर बे व भूमिगत काम तातडीने करण्याची योजना राबवणे, नवीन उपविभाग व शाखा कार्यालय स्थापित करणे अत्यावशक आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

 

भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग होणार…

भोसरी विभागांतर्गत भोसरी एमआयडीसी तसेच सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. औद्योगिक, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी कुशल प्रशासकी नियंत्रणासाठी भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग करणे गरजचे आहे. भोसरी उपविभाग क्र. १ अंतर्गत भोसरीगांव शाखा, नाशिकरोड शाखा कार्यालय आणि चऱ्होली शाखा कार्यालय स्थापन करणे आवश्यक आहे.

भोसरी उपविभाग क्र. २ अंतर्गत इंद्रायणीनगर शाखा कार्यालय( नवीन प्रस्तावित), मोशी शाखा कार्यालय, आकुर्डी उपविभाग अंतर्गत चिखली शाखा कार्यालय ( नवीन प्रस्तावित) उभारण्याची आवश्यकता आहे. याबाबत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महावितरण पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला गती मिळेल, अशी अपेक्षा आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा लावला विवाह ; मुलगी ५ महिन्यांची गर्भवती, आई-वडिलासंह ५ जणांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.