पुणे : कॉफीतून गुंगीचे ओैषध देऊन वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करुन मित्रांनीच खून केल्याचा छडा लावण्यास बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहे.
निलेश वरघडे (वय-४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. दीपक जयकुमार नरळे (रा. नऱ्हे, आंबेगाव) व त्याचा साथीदार रणजीत ज्ञानदेव जगदाळे (वय-२९) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रुपाली रुपेश वरघडे (वय ४०) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश वरघडे वास्तूशास्त्र सल्लागार होते. निलेश आणि आरोपी दीपक हे मित्र होता. आरोपींनी नऱ्हे भागातील एका ओैषध दुकानात पूजेसाठी आरोपी नरळे आणि जगदाळे निलेश यांना घेऊन गेले होते. निलेश यांना कॉफीतून गुंगीचे ओैषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरुन नीरा नदीत टाकून दिला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
दरम्यान, निलेश बेपत्ता झाल्याची तक्रार रुपाली वरघडे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे निलेश वरघडे याचा मित्र दीपक नरळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दीपक नरळे यांनी दिशाभूल करून उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच आरोपी नरळे आणि जगदाळे यांनी खून केल्याची कबुली दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोप आढळून आले आहेत.
हि कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.