जनार्दन दांडगे
लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते यवत या दरम्यान वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी लोणी काळभोर हद्दीतील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील 15 मिटर (पन्नास फुट) अंतराची अतिक्रमणे दिवाळी नंतर काढण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबतची नोटीस वर्तमानपत्रात दिली असुन, दिवाळी नंतर कोणत्याही क्षणी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी “पुणे प्राईम न्यूज” ला दिली आहे.
लोणी काळभोर हद्दीतील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुला हॉटेल, टपऱ्या, भाजीविक्रते, दुकानदार यांनी मागिल कांही वर्षात मोठ्या प्रमानात अतिक्रमणे केली आहेत. यामुळे रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुचा रस्ता अरुंद झाल्याने, वहातुक कोंडी व अपघात वाढल्याने, दिवाळी नंतर कोणत्याही क्षणी कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील 15 मिटर (सुमारे पन्नास फुट) अंतराची अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती, राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी “पुणे प्राईम न्यूज” ला दिली आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिलेल्या नोटीसमध्ये नमुद केलेल्या प्रमाने, कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील 15 मिटर (पन्नास फुट) अंतराची अतिक्रमणे काढण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान ज्यांनी ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत, अशा सर्वानी पुढील सात दिवसाच्या आत आपआपली अतिक्रमणे काढवीत अशा सुचना केलेल्या आहेत.
दरम्यान, अतिक्रमण धारकांनी स्वतःहुन पुढील सात दिवसाच्या काळात अतिक्रमणे न हटविल्यास, अतिक्रमन कारवाईचा खर्च अतिक्रमण धारकांच्याकडुन वसुल करण्यात येणार आहे. हडपसर ते यवत या दरम्यान वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ही कारवाई सुरु करण्यात येणार आहे. नागरीकांनी स्वतःहुन सहकार्य करावे अशी विनंती ही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.