पुणे : पुण्यातील अमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिट दोनने मोठी कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे.
कोंढव्याजवळील बोपगाव मधील गोडाऊनवर येवलेवाडी खडी मशीन चौकात छापा टाकून तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला आहे.
बेकायदा छुप्या पद्धतीने तंबाखूजन्य, पान व गुटखा मसाला तस्करीवर अमली पदार्थविरोधी पथकाने छापेमारी केली आहे. पथकाने टेम्पोचालक सिराज नूरआलम मन्सुरी याला ताब्यात घेत तंबाखूजन्य पानमसाला,गुटख्याची पोती व टेम्पो जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर बोपगाव मधील गोडाऊनवर छापा टाकून आणखी ५ लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला.
कोंढवा परिसरात येवलेवाडी खडी मशीन चौकात पथकाने छापा टाकून ९ लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले असल्याची माहिती सोमवारी दिली. याप्रकरणी सिराज नूरआलम मन्सुरी (२९, रा कोंढवा) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थविरोधी पथक दोनला येवलेवाडी ते खडी मशीन चौकात टेम्पोतून तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.