Shikrapur News शिक्रापूर : किरकोळ वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे नुकतीच घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर ॲट्रॉसिटी सह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Shikrapur News)
नीलम गणेश शिवले, गणेश यशवंत शिवले, मुठ्या भंडारे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरासमोर त्यांची गरोदर मुलगी चालत असताना त्यांच्याच घरासमोर काही मुले फुटबॉल खेळत होती, त्यामुळे मुलीला बॉल लागेल या भीतीने फिर्यादी यांनी फुटबॉल खेळत असलेल्या मुलांची आई नीलम शिवले यांना आवाज देऊन मुलांचा बॉल घरात ठेव असे म्हणाल्या.(Shikrapur News)
त्यानंतर नीलम शिवले यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करत घराशेजारी पडलेला पाईप घेऊन मारला. त्यानंतर नीलम शिवले यांनी फोन करून पती गणेश शिवले व भाऊ मुठ्या भंडारे या दोघांना बोलावून घेतले, तर काही वेळातच गणेश व मुठ्या दोघे आले व त्यांनी फिर्यादी यांनी जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली.(Shikrapur News)
दरम्यान, फिर्यादी यांची मुले भांडणे सोडविण्यासाठी आली असता मारहाण करणाऱ्या तिघांनी त्या मुलांना देखील धक्काबुक्की करत दमदाटी केली, तर मुलांना झालेल्या धक्काबुक्कीत महिलेच्या मुलीला चक्कर आल्याने कोरेगाव भिमातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे(Shikrapur News)
याप्रकरणी फिर्यादी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी नीलम गणेश शिवले, गणेश यशवंत शिवले, मुठ्या भंडारे या तिघांवर जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याने ॲट्रॉसिटी सह मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार चंद्रकांत काळे करीत आहेत(.Shikrapur News)