पुणे : सेक्स्टॉर्शनमुळे कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात राजस्थानमधील गुरुगोठडी नावाचे पूर्ण गावाचे सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरुणांच्या आत्महत्येप्रकरणी पुणे पोलीस तपास करत असताना या माहितीमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत.
पुण्यात सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून तरुणांना धमकाविले जात होते. त्यामुळेच दोघा तरुणांनी आत्महत्या केली होती. या घटनेचा पुणे पोलीस तपास करत होते.
ज्या मोबाईलनंबर वरून खंडणी मागण्यात आली, त्याचा तपास पोलीस करत होते. यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना तो मोबाईल नंबर राजस्थानच्या अलवर जिल्ह्याच्या लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडीमध्ये लोकेट झाला.
आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या एका पथक गावात पोहचून त्यांनी अन्वर खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला असता गावातील लोकांनी थेट पथकावरच हल्ला चढविला. तरी देखील पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने चौकशीदरम्यान काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या. गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असे आरोपीने सांगितले.
सोशल मेडियाच्या माध्यमातून बनावट अकाउंट्स तयार करून त्यावरून मुलगी बोलत असल्याचं सांगून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून काही फोटो, व्हिडीओ शेयर करायला सांगितलं जाते, त्यानंतर फे फोटोज मॉर्फ करून, अर्धनग्न करून पुन्हा पाठवले जातात.
याच फोटोंच्या जोरावर तरुणांना ब्लॅकमेल करून पैशांची वेळोवेळी मागणी केली जाते. या प्रकारांचे प्रकार खूप वाढले आहेत. अशाच प्रकरणात फासून शंतनु वाडकर व अमोल गायकवाड यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला.