पुणे : रविवारी फिफा स्पर्धेत बेल्जियमला मोरोक्को यांच्यात सामना झाला. फिफा विश्वचषक स्पर्धेत मोरोक्कोने विजेतेपदाच्या दावेदार बेल्जियमला २-० असे पराभूत केले.
दुबळा संघ मानल्या जाणाऱ्या मोरक्कोने बेल्जियमला पराभवाचा धक्का दिला. या घटनेचे पडसाद बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पाहायला मिळाले.
या घटनेचे पडसाद ब्रसेल्समध्ये पाहायला मिळाले असून अनेक ठिकाणी अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार करत वाहनांची तोडफोड केली. आंदोलकांनी गाड्या पेटवल्या. हिंसाचारात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बेल्जियमचा पराभव झाल्यानंतर ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळल्याचे दिसून आले. पराभव झाल्यामुळे संतापलेल्या लोकांना इलेक्ट्रिक कारसह अनेक स्कूटर्स, गाड्या यांना आग लावली.
ब्रुसेल्समध्ये चाहत्यांनी निषेध नोंदवत कार आणि स्कूटर पेटवल्या. बेल्जियममध्ये दंगल झाली. या घटनेनंतर ब्रसेल्स पोलिसांनी हिंसाचार प्रकरणात अनेकांना ताब्यात घेतलं आहे.