हडपसर : शहरात कोयते हातात घेऊन दहशत निर्माण माजविणाऱ्या कोयता गॅंगच्या टोळीप्रमुखासह १३ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
टोळीप्रमुख समिर लियाकत पठाण (वय-२६, पुर्वी रा. साने गुरुजी वसाहत, माळवाडी, हडपसर, सध्या रा. के वैशाली हाईटस, विशाल कॉलनी, मांजरी) शोएब लियाकत पठाण (वय-२०, के वैशाली हाईटस, विशाल कॉलनी, मांजरी) गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, वय २२ वर्षे, रा. हवालदार चाळ, महादेवनगर मांजरी,) प्रतिक ऊर्फ एस. के. हनुमंत कांबळे (वय – २०, रा. साई श्रध्दा पार्क, गोपाळपट्टी मांजरी) गितेश दशरथ सोलनकर (वय – २१, रा. ढेरे बंगला घुले कॉलनी नं. ४, मांजरी रोड, हडपसर) ऋतिक संतोष जाधव, वय- १९, रा. उदय कॉलनी, रुक्मीणी निवास, महादेवनगर, मांजरी) साई राजेंद्र कांबळे, वय-२०, रा. साई श्रध्दा पार्क, अजिंक्य तारा बिल्डींग, गोपाळपट्टी, मांजरी) ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले, वय २४ भाऊसाहेब तुपे नगर, अंसारी फाटा, साडे सतरानळी, मांजरी) ऋतिक सुनिल मांढरे (वय – २२,महादेवनगर मांजरी रोड, दुर्वाकर निवास, हडपसर) प्रतिक शिवकुमार सलगर वय- १९ वर्ष साईरामनगर गोपाळपट्टी, मांजरी, तीन पाहिजे आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक (ताब्यात) यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील १ ते १० आरोपींना यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराजा बियर शॉपीच्या समोरील रस्त्यावर गोपाळपट्टी चौक, मांजरी बुद्रुक या ठिकाणी ८ ते १० मुलांनी ९ डिसेंबर रोजी काही नागरिकांना दगडाने, बेल्टने मारहाण केली होती. तसेच जाताना कोयते हवेत फिरवत नागरिकांना ‘आम्ही इथले भाई आहोत,’ तुम्हाला परत येऊन बघतो असे म्हणून दहशत निर्माण केल्यामुळे फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे.
दरम्यान, आरोपी समिर लियाकत पठाण हा मुख्य (टोळी प्रमुख) हा त्याचे इतर साथीदार शोएब लियाकत पठाण, गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार यांचेवर पुणे शहरात वेग-वेगळया पोलीस ठाण्या मध्ये दरोडा, मारामारी, जबरी चोरी असे शरिराविरूध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल असुन दादा हवालदार यास यापुर्वी तडीपार करण्यात आले होते.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजन शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परि-५, विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, तपास पथक निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, प हंबर्डे, दुधाळ, सोनवणे सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, गिरीष एकगे गेली आहे.