Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात एका महिन्यात तब्बल ११ कोटी रुपयांची वीजचोरी, महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने आणली उघडकीस…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 13 January 2023, 10:07

मुंबई : महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने डिसेंबर २०२२ या एका महिन्यात केलेल्या धडक कारवाईत राज्यात वीजचोरीच्या ८७९ प्रकरणात ११ कोटी ६९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या ६३ भरारी पथकांनी कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली. महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. वीजचोरीशिवाय इतर अनियमितता असलेल्या एकूण ५३९ प्रकरणांमध्ये १३ कोटी ६७ लाख ६० हजार रुपयांची वीजदेयकेही देण्यात आली.

वीजचोरी पकडलेल्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. पुण्याजवळ वाघोली येथे भरारी पथकाने धाड टाकली असता दोन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली. त्यांना १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले.

दोन्ही औद्योगिक ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ अन्वये वीजचोरी फिर्याद दाखल करण्यात आली. उल्हासनगरमध्ये एका औद्योगिक ग्राहकावर धाड टाकल्यावर वीजचोरी उघडकीस आली. त्या ग्राहकास ३१ लाख ६५ हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल दिले. जालना जिल्ह्यात एका स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली व संबंधितांना ५१ लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले. तसेच त्यांच्या विरोधात वीजचोरीची फिर्यादही दाखल करण्यात आली. अशा रितीने इतर अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.

डिसेंबर महिन्यात सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने केलेल्या कारवाईमध्ये उघड झालेल्या ८७९ प्रकरणातील ११ कोटी ६९ लाख रुपयांच्या वीजचोरीपैकी कोकण परिक्षेत्रात ४ कोटी ४० लाख रुपयांची २४९ प्रकरणे उघडकीस आली. पुणे परिक्षेत्रात ३ कोटी ६८ लाख रुपयांची १३५ प्रकरणे उघडकीस आली. नागपूर परिक्षेत्रात २४४ प्रकरणांमध्ये १ कोटी ७२ लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. औरंगाबाद परिक्षेत्रात १ कोटी ८८ लाख रुपयांची २५१ वीजचोरी प्रकरणे उघड झाली.

सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत भरारी पथकांमार्फत एकूण ६८०१ प्रकरणे उघडकीस आणली. त्यामध्ये ८६ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. याखेरीज इतर अनिमितता असलेल्या एकूण ६३३६ प्रकरणांमध्ये १६७ कोटी ११ लाख रुपयांची देयके देण्यात आली.

दरम्यान, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कंपनीच्या सर्व मुख्य अभियंत्यांना वीजचोरी रोखण्यासाठी आक्रमकपणे कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. कंपनीच्या भरारी पथकाखेरीज स्थानिक कर्मचाऱ्यांनीही सजगपणे वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्याचा व कारवाई करण्याचा आदेश त्यांनी दिला. प्रत्येक सर्कल पातळीवर याबाबत पाठपुरावा करण्याचाही आदेश त्यांनी दिला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बनावट नोटांचा कारखाना? 500 रुपयांच्या नोटांचा खच, 4 जणांना ठोकल्या बेड्या

Tuesday, 27 October 2026, 9:45

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55

कोण मारणार बाजी? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी लढत; निकालाआधी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Tuesday, 27 October 2026, 8:41

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43
Next Post

हडपसर येथील कोयता गॅंगच्या टोळीप्रमुखासह १३ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई ; दहा जणांना अटक..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp