पिंपरी : भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने स्कुटरला जोरदार धडक दिल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून या अपघातात मृत्यू झालेल्या मुलाची आई देखील जखमी झाली आहे.
अथर्व रवींद्र आलाने (वय ११) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकत होता. सकाळी ७. ३० च्या सुमारास मयत अथर्वची आई हर्षदा आलाने स्कूटरवर अथर्वला शाळेत सोडण्यासाठी जात होती.
यावेळी शाहू नगर कॉर्नरजवळ चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे ते दोघेही रस्त्यावर पडले. एका बाजूला मुलाची आई व दुसऱ्या बाजूला पडलेला अर्थवला त्याच चारचाकी गाडीला आदळला. व तेथेच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.