सागर जगदाळे
Accident News | पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव नजीक मिथेनाॅल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात झाला आहे. या अपघातात हजारो लिटर मिथेनाॅल रस्त्यावर सांडले आहे. यामुळे काही वेळासाठी वाहतूक संथ झाली होती.
टॅकरचे डाव्या बाजूचे पुढील चाक तुटल्याने अपघात…
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूरच्या दिशेने हा टॅकर निघाला होता. त्या दरम्यान पळसदेव नजीक काळेवाडीच्या उतारावर टॅकरचे डाव्या बाजूचे पुढील चाक तुटल्याने अपघात झाला. मात्र वेळीच वाहनचालकाने प्रसंगावधान राखले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशी माहिची माहिती महामार्ग पोलीसांनी दिली.
मिथेनाॅल हा ज्वलनशील पदार्थ असल्याने मोठी दुर्घटना झाली असती. तत्काळ महामार्ग पोलीस आणि इंदापूर पोलीसांनी कर्मयोगी साखर कारखान्याच्या अग्निशामकच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या या मिथेनाॅलवर पाण्याचा फवारा मारला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Bacchu Kadu News : प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक