Accident | कात्रज (पुणे) : दत्तनगर-जांभुळवाडी रस्त्यावरून आंबेगावकडे निघालेल्या एका दुचाकी चालकाचा रेडिमिक्स ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मकरंद गोपाळ जिंदे (वय ३४, रा. आंबेगाव बु.) असे या अपघातात मृत्यमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मकरंद जिंडे हे जांभूळवाडी कडून दत्तनगर चौक मार्गे आंबेगावकडे जात असताना त्याची दुचाकी घसरली. पाठीमागून येणाऱ्या रेडिमिक्स ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने मकरंद जिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मृतदेह शवाविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून रेडिमिक्स चालकास पुढील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, दत्तनगर शनिनगर रोडवर अवजड वाहतुकीस बंदी असून दुपारी बारा ते चारच्या दरम्यान वाहतुकीस मुभा आहे. तसेच अरुंद रस्ते आणी निकामी पदपथ यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागते आहे.