प्रा. सागर घरत
Karmala Bribe करमाळा : वारस नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना उमरडच्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेऊर (ता. करमाळा) (Karmala Bribe) येथे आज मंगळवारी (ता.३०) रंगेहात पकडले आहे. (Karmala Bribe)
करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शाहिदा युनूस काझी (वय ४२) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी वारस नोंदीसाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी आरोपी शाहिदा काझी यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती २० हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेऊर येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाहिदा काझी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अआहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक करीत आहेत.
हि कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार स्वामीराव जाधव, पोलीस नाईक अतुल घाडगे, सलीम मुल्ला, शाम सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :