Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शहरात 17 गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी ‘पैडी’ पोलिसांच्या जाळ्यात ; गुन्हे शाखा युनिट-2 ची धडक कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 2 July 2026, 10:45

हडपसर, (पुणे) : मांजरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या (फरार) गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पर्वती परिसरातील निलायम चौकात शिताफीने सापळा रचून अटक करण्यात आले आहे.

प्रथम उर्फ पैडी सुरेश म्हस्के (वय-22, रा. सिद्धार्थ कंपनीशेजारी, 132 दांडेकर पूल, पर्वती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीवर तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई देखील करण्यात आलेली आहे. त्याच्याविरुद्ध मांजरी पोलीस स्टेशन येथे गु. र. नंबर २७/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांन्वये गुन्हा दाखल होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 01) गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मांजरी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी प्रथम म्हस्के हा निलायम चौकात उभा आहे.

 

माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या आदेशाने महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार आणि त्यांच्या पथकाने निलायम चौक परिसरात तत्परतेने वेढा दिला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पैडीला पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपी प्रथम उर्फ पैडी म्हस्के याचा गुन्हेगारी अभिलेख (रेकॉर्ड) तपासला असता अवघ्या 22 वर्षांच्या या गुन्हेगारावर पुणे शहरात खालीलप्रमाणे एकूण 17 गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली. त्याच्या या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कडक कारवाई देखील करण्यात आली होती. अटकेनंतर आरोपीची कायदेशीर नियमानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील तपास आणि न्यायालयीन कारवाईसाठी त्याला मांजरी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची धडक कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गोहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-1) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तसेच पोलीस अंमलदार विशाल दळवी, संदीप शिर्के, शंकर नेवसे, ऋषीकेश व्यवहारे, योगेश मांढरे, अझीम शेख आणि सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

वाघोली येथील आथिती लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, दोन एजंट अटकेत तर तीन महिलांची सुटका,

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.