Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोली येथील आथिती लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, दोन एजंट अटकेत तर तीन महिलांची सुटका,

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 2 July 2026, 11:15

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने (Anti Human Trafficking Unit) वाघोली परिसरातील एका लॉजवर टाकलेल्या धाडीत वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन एजंटांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आफताब इद्रीस अहमद (वय २१, रा. खराडी) आणि गणेश सुनिल हांडगर (वय २३, रा. बावडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तुषार नामदेव भिवरकर यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पथक ३० जून रोजी शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाविरोधात विशेष मोहिम राबवत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत आफताब अहमद आणि गणेश सुनिल हांडगर हे ग्राहकांना मुली पुरवून वाघोली-उबाळेनगर परिसरात वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाची नियुक्ती केली. एजंट आफताब याच्याशी मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर त्याने उबाळेनगर येथील आथिती लॉज येथे येण्यास सांगितले. शॉर्ट सर्व्हिससाठी १,५०० रुपये निश्चित करण्यात आले. पोलिसांनी पंचांसमक्ष त्या नोटांचे क्रमांक नोंदवून बनावट ग्राहकाकडे सुपूर्द केले.

 

पूर्वनियोजित योजनेनुसार बनावट ग्राहक लॉजमध्ये पोहोचला. तेथे तीन महिलांना दाखवून त्यापैकी एकीची निवड केल्यानंतर एजंट आफताबने १,५०० रुपये स्वीकारले. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने पोलिसांना व्हॉट्सॲपद्वारे लोकेशन पाठवताच गुन्हे शाखेच्या पथकाने लॉजवर छापा टाकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

छाप्यात तीन महिला आणि दोन एजंट ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित महिलांनी, आरोपी आफताब अहमद व गणेश हांडगर यांनी भरपूर पैसे मिळण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची कबुली दिली. ग्राहकांकडून १,५०० रुपये घेऊन त्यापैकी प्रत्येकी १,००० रुपये महिलांना दिले जात असल्याचे, तर उर्वरित रक्कम एजंट स्वतः ठेवत असल्याची माहितीही समोर आली.

कारवाईदरम्यान बनावट ग्राहकाकडून स्वीकारलेले १,५०० रुपये आरोपी आफताब अहमद याच्याकडून जप्त करण्यात आले. पंचांसमक्ष नोटांचे क्रमांक तपासल्यानंतर तीच रक्कम असल्याची खात्री करण्यात आली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले असून, आरोपी आफताब इद्रीस अहमद आणि गणेश सुनिल हांडगर यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51
Next Post

सिया गोयलच्या अडचणी वाढणार!केतनच्या मोबाईल फोनमुळे अनेक रहस्य उलघडणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp