हडपसर : हडपसर येथून दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१२) रात्री उघडकीस आली आहे. यामुळे हडपसरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गणेश मुळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुळे याच्या कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मुळे हा हडपसर परिसरातून रविवारी (ता.११ डिसेंबर) घरातून बेपत्ता झाला होता. दरम्यान, कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात सोमवारी रात्री गणेशचा मृतदेह सापडला. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याचे उघडकीस आले. खुनामागचे कारण समजू शकले नाही.
हडपसर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.