(Pune Crime News ) पुणे : ‘तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का’असे बोलल्याने एक तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाला मारहाण करुन रिक्षावर दगडफेक करुन नुकसानही केले. तसेच याच तरुणावर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विजय धनराज गिते (वय २८, रा. दुबे नगर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station )तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्याच गल्लीतील महिला, तिचा पती व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक आहेत. त्यांची पत्नी माहेरी गेली आहे. मंगळवारी ते गल्लीतील लोकांसोबत धुळवड खेळले. त्यानंतर दुपारी जेवणासाठी केसनंद वाडे बोल्हाई रोडवरील हॉटेल गारवा येथे सर्वजण जेवणासाठी गेले. जेवण करीत असताना दादाराव फिर्यादी यांना तुला तुझी बायको सांभाळता येत नाही. सारखा तिच्यासोबत भांडत असतो, असे बोलले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
तेव्हा फिर्यादी यांनी तू मला शिकवू नको, मी माझे बघतो काय करायचे, असे बोलून ते तेथून निघून घरी आले. त्यानंतर काही वेळात दादाराव इतरांना घेऊन त्यांच्या घरी आले. त्यांच्या तोंडात मारली. घराच्या दरवाज्यावर, खिडकीवर दगड मारुन काचा फोडल्या. गजाने मारहाण केली. दारात उभ्या असलेल्या रिक्षाचे हुड व काचा फोडल्या.
दरम्यान, याविरोधात महिलेने फिर्याद दिली आहे. गारवा हॉटेल येथे कारण नसताना गालावर चपराक मारली. तसेच पतीला तू चेअरमन असला म्हणून काय झाले़ तुला खोट्या तक्रारीत कसे फसवतो, असे बोलून धमकी दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी घरी गेल्या असताना त्यांना स्वत:जवळ ओढून जबरदस्तीने हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar News : अजित पवार यांना मोठा झटका ; विखे पिता पुत्राची अहमदनगरमध्ये यशस्वी खेळी!
Hadapsar Good News : हडपसर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्स्प्रेससह आणखी चार एक्स्प्रेसना थांबा..!
Pune News : आजीची चेन चोरणाऱ्या चोरट्याला नातीने दाखवला इंगा ; १० वर्षीय नातीचं सर्वत्र कौतुक..!