मुंबई : राष्ट्रध्वज घरावर लावताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. हा व्हिडिओ कुठला आहे. हे मात्र सांगता येत नाही. परंतु, हा व्हिडिओ सद्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पाहण्यसाठी येथे क्लिक करा :
देशाच्या स्वातंत्र्याला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत सर्व भारतीयांना तिरंगा फडकविण्याचे अवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्व भारतीयांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी एक युवक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी गेला होता. झेंडा लावताना लोखंडी पाईप विजेच्या तारेला लागला. त्यानंतर सदर अनोळखी तरुण चिकटला गेला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ,पोलीस आणि नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु, घरावरती पाणी साचले असल्याने त्या तरुणाला लवकर मदत मिळू शकली नाही. विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर तरुणाला विजेच्या प्रवाहातून सुटका केली. परंतु, यागोदारच तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
राष्ट्रध्वज लावताय, मग काळजी घ्याच…
राष्ट्रध्वज लावताना अडचणी आणि धोकादायक ठिकाणी लावू नये. राष्ट्रध्वज सुरक्षित ठिकाणी लावावा. राष्ट्रध्वज लावताना तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. परंतु, राष्ट्रध्वजाचा अवमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये.