पुणे : सण-उत्सवाचे दिवस लक्षात घेता अन्न आणि औषध प्रशासन खाद्यतेल, वनस्पती, तूप, मिठाई, खवा, बेसन आदी अन्न पदार्थाच्या विक्रेत्यांवर लक्ष अन्न व औषध प्रशासन विभाग लक्ष ठेवून आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने आज मोठी कारवाई केली.
आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आज मार्केट यार्ड येथे अचानक छापे टाकून कारवाई करण्यात आली. यात 10 लाख 58 हजार 380 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सहायक आयुक्त (अन्न) बा. म. ठाकुर, ग. पां. कोकणे, अन्न सुरक्षा अधिकारी नि. बा. खोसे, अ. सु. गवते आदींनी या कारवाईमध्ये भाग घेतला.
मार्केट यार्ड येथे आज पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करण्यात आली. या पदार्थांचे नमुना घेऊन उर्वरित 3 लाख 529 रुपये किंमतीचा 1 हजार 288 किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा 4 लाख 37 हजार 966 रुपये किंमतीचा 2 हजार 53 किलो साठा असा एकूण 7 लाख 38 हजार 495 रुपयांचा साठा जप्त केला आहे.