पुणे : फ्लॅट नावावर करुन देण्याचे आमिष दाखवून महिलेवर ज्येष्ठ वकिलाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात उघडकीस आली आहे. सदर प्रकार हा डेक्कन, गोकुळनगर- कोंढवा आणि शनिवार पेठेत मार्च २०१९ ते १८ मे २०२२ या दरम्यान घडला.
वसंत धडकु पाटील (वय-७५, रा. गोदरेज रोझवूड सोसायटी, शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेला आरोपी पाटील याने फ्लॅट नावावर करुन देण्याचे आमिष दाखविले. आणि पिडीत महिलेला शनिवार पेठेतील फ्लॅटवर घेऊन जाऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
त्यानंतर आरोपीने पिडीत महिलेला बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच पतीला उलट सुलट सांगण्याची भिती दाखविली. पिडीत महिलेच्या लहान मुलाचे बरेवाईट करण्याची भिती दाखविली. त्यांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
दरम्यान, कोंढवा पोलिसांनी आरोपी वसंत पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिळमकर करीत आहेत.