Sangli News : सांगली : पैज लावणे हा प्रकार काही नवा नाही. अनेकदा निवडणुकांदरम्यान पैज लावली जाते. पराभव झाला तर मुंडन करेन, विजयी झाले तर ५०० ची पैज… अशा पैजा सर्रास लावल्या जातात. मोमोज खाण्याच्या पैजेपायी एका तरुणाचा जीव गमावल्याचा प्रकार देखील नुकताच घडला आहे. पैज लावण्याचे हे प्रकार कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. याच पैजेच्या विड्यापायी सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पैजेखातर एक तरुण चक्क कपडे काढून फिरत असल्याचे समोर आले आहे. हा तरुण अर्धनग्न अवस्थेत भर रस्त्यात वाजत गाजत मिरवणूक काढून फिरत होता.(Sangli News)
कर्ज माफ होण्यासाठी तरुणाने ही अजब पैज निभावण्याचे आव्हान स्विकारले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हा संतापजनक प्रकार सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यात घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या तरुणाने तीन लाखांचे घेतलेले कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्याची त्याची ऐपत नव्हती. अखेर कर्ज माफ होण्यासाठी तरुणाने ही अजब पैज निभावण्याचे आव्हान स्विकारले.(Sangli News)
पैज जिंकण्यासाठी संबंधित तरुण शहरातील महाकाली साखर कारखान्यापासून शहराच्या मुख्य चौकापर्यंत चड्डी आणि बनियन घालून भर रस्त्याने चालत आला. या वेळी तरुणाच्या मागे एक वाजंत्री देखील होता. भर दिवसा रस्त्यावरून निघालेली ही अजब मिरवणूक पाहून वाटसरू, वाहनचालक आश्चर्य व्यक्त करत होते.(Sangli News)
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तरुणाला व पैज लावणाऱ्या साथीदारांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले आहे. मात्र, शहरातून निघालेल्या या अजब मिरवणुकीची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.(Sangli News)