पुणे : पुण्यातील एका तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन तो इन्स्टाग्रामवर अपलोड करुन विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका १८ वर्षीय तरुणीने सोमवारी (ता.१२ ) कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नाशिक येथील एका तरुणावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची नाशिक येथील तरुणासोबत मैत्री होती. फिर्यादी आणि आरोपी हे इन्स्टाग्रामवर मेसजवरून एकमेकांशी संवाद साधायचे. त्यानंतर आरोपी तरुणाने तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन तो इन्स्टाग्राम व्हायरल केला.
दरम्यान, हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.