सागर जगदाळे
भिगवण : दहशत माजविण्याच्या उद्देशाने भिगवणमध्ये सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र सोबत बाळगल्या प्रकरणी भिगवण पोलिसांनी शस्त्रासह दोघांना अटक केली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२१) रोजी सकाळी ११ च्या सुमारास भैरवनाथ शाळेचे समोरील रोडवर संशयित आरोपी शुभम संजय देवकाते ( वय २१ वर्षे रा. मदनवाडी ता. इंदापूर ) व तौफीक रियाज शेख ( वय २२ वर्षे, रा वॉर्ड २ भिगवण ) हे दोघे कोयते घेऊन यामाहा (एमएच ११ – ९०९३) गाडीवर फिरत होते.
यावेळी पोलिसांनी त्यांना पकडून अधिक चौकशी केली असता त्यांच्याजवळ कोयता आढळून आला. बेकायदा शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने फिरत असल्याने दोघांवर भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार लोडी करत आहेत.