बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर : इंदापूर तालुक्यातही पिंपरी बुद्रुक येथे संपुर्ण भावार्थ रामायण सोहळा संपन्न झाला असून सोहळा समाप्तीसाठी जगतगुरु संत तुकाराम महाराज याचे ११ वे वंशज सोहम महाराज यांनी उपस्थिती सर्वांसाठी भक्तिपूर्ण होती.
गेल्या चार महिन्यापूर्वी सोहम महाराज यांच्या ग्रंथ पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने या ग्रंथाचे वाचन व विवेचन सुरु होते. काल सोहळ्याची सांगता देखील सोहम महाराज यांच्या शेवटच्या अध्याय वाचनाने झाली. या सोहळ्याचे अनेक वर्षांपासून आयोजन करण्यात येते.
यावेळी बोलताना सोहम महाराज यांनी ग्रामस्थांचे सोहळ्यासाठी कौतुक करताना, गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच आपल्या गावावर व भाविकांवर आसणार आहे. आशा प्रकारचा धार्मिक सोहळा व हरिभक्त पारायणचा सप्ताह करण्यासाठी विसर पडू देऊ नका.
आमचे देहुकर कुटुंब सदैव गावच्या व भाविकांच्या पाठीशी उभे राहील. कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा व कैलासवासी पांडुरंग बोडके नाना यांच्या विचाराच्या शिदोरीची जपणूक करावी, असे म्हणाले.
तसेच यावेळी हभप डॉ. लक्ष्मण आसबे यांनी देखील भावार्थ रामायणाबाबत आपले विचार व्यक्त केले. संपूर्ण रामायणाच्या वाचक व सुचक म्हणून बाळासाहेब घाडगे, महादेव सुतार, संदिपान पडळकर, शिवाप्पा बोडके, वर्धमान बोडके, आशोकआबा बोडके, शंकर बोडके, महेश सुतार, सोमनाथ सुतार, नागनाथ काशीद, ह भ प श्रीमंत भोसले, भावार्थ रामायणाच्या समाप्ती सोहळ्यासाठी संपूर्ण महाप्रसादाची व्यवस्था माजी सरपंच आबासाहेब बोडके व सौदागर काटकर यांच्या वतीने करण्यात आली.
सोहळ्यासाठी पिंपरी बुद्रुक गावचे आनंता बोडके, बबनदादा बोडके, प्रभाकर बोडके, रामचंद्र लावंड, माजी सरपंच श्रीकांत बोडके , पोलीस पाटील वर्धमान बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, चेअरमन निलेश बोडके, नामदेव बोडके,संचालक संजय बोडके, उपसरपंच पांडूदादा बोडके, विद्यमान सरपंच ज्योती बोडके, संतोष सुतार, तसेच ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.
भावार्थ रामायणाचे पारायण करणाऱ्या वाचक व सूचक यांना संपूर्ण कपड्यांचा पोशाख माजी चेयरमन अशोक बोडके यांच्या वतीने करण्यात आला.
शेवटी महाप्रसाद घेऊन समाप्ती सोहळ्याची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी वाचक आणि सूचक नरसिंहपूर, टणु, गिरवी, गोंदी, सराटी, ओझरे, गारअकोले,टाकळी, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, या सर्वच भागातून मोठ्या संखेने उपस्थितीत होते.