पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय सुरु असलेल्या ‘स्पा’वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घालून तीन परदेशी तरुणींसह चौघींची सुटका केली. तसेच स्पाचा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लालरामन लाल्तफळा (रा. कोंढवा), संदीप मोकाशी (रा. कोंढवा) आणि अमोल राऊत ( रा. कोंढवा ) यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम अंतर्गत तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भीमराव दत्तोबा म्हस्के (वय ६०, रा.काळेवाडी) असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यासह काळेवाडी येथील एका ३२ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुल्लानगर येथील गुलमोहर बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ६ मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून कोंढव्यातील स्पर्श स्पा येथे छापा टाकला.
त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं आढळून आले. तेथे तीन परदेशी तरुणी व एक भारतीय तरुणी अशा चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. तसेच संबंधित स्पाचा मालक व व्यवस्थापक अशा दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस कर्मचारी प्रमोद मोहिते, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.