हनुमंत चिकणे :
Loni kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल २३ लाख ५ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क पथकाने जप्त केला आहे. हि कारवाई शेखर काळभोर यांच्या शेतातील बल्लाळ वस्ती, सरकारी कॅनॉल जवळ, बुधवारी (ता. ०५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. Loni kalbhor News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सी. बी. राजपूत यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे व भरारी पथक क्र. २, पुणे या कार्यालयाच्या पथकामार्फत बुधवारी (ता. ०५) दुपारी लोणी काळभोर गावाच्या परीसरात बल्लाळ वस्ती, शेखर काळभोर यांचे शेतात सापळा लावून अवैध गावठी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकला. यावेळी गावठी दारु विविध ब्रँडच्या बाटल्या, एक ट्रॅक्टर, विना क्रमांकाची डंम्पिंग ट्रॉली, अल्टो चारचाकी, टेम्पो, अशी वाहने जप्त केली आहेत. Loni kalbhor News
दरम्यान, यावेळी एकुण २१ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून अटक आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता सोमवारी (ता. १०) पर्यंत पोलिस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी २३ लाख ५ हजार ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई, सी. बी. राजपुत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली संजय कोल्हे, निरीक्षक, जी विभाग, पुणे, अशोक शितोळे, निरीक्षक, राउशु, भरारी पथक क्र.२, राजु वाघ दु. निरीक्षक, कुमार ढावरे, बाळासाहेब नेवसे, भोसले सर्वश्री जवान प्रिया चंदनशिवे, संतोष गायकवाड, दत्ता आवणावे, कांवळे, वाव्हळ, किसन पावडे, मुस्तापुरे, सिसोलकर, नागरगोजे यांनी केलेली आहे. दरम्यान, सदर गुन्हयाचा पुढील तपास अशोक शितोळे, निरीक्षक, राउशु, भरारी पथक क्र. २ करत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध हातभट्टी निर्मुलन मोहिम यापुढे कायमच राबविण्यात येणार असल्याने पुणे जिल्हयामध्ये कोणत्याही नागरीकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ व दुरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्यात यावी, व या विभागास अवैध हातभट्टी निर्मुलन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे सी. बी राजपुत यांनी नागरिकांना केलेले आहे.