पुणे : एका ६५ वर्षीय ज्येष्ठ वृद्धाने पाळलेल्या कुत्रीस खायला बोलावून स्वतःच्या घरातील खोलीमध्ये दोन महिन्यांपासून वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार टाकळकरवाडी (ता. खेड) येथे नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भिवसेन धोंडीबा टाकळकर (वय-६५, रा. टाकळकरवाडी, ता. खेड) ) असे घृणास्पद कृत्य करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतात. त्याने राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवून मागील दोन महिन्यांपासून घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केला. सदरचा प्रकार शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्याने हा सगळा प्रकार स्थानिक युवकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले आहे.
दरम्यान, याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार आणि क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे.