पुणे : पुणे-सातारा महामार्गावरून ८ किलो गांजाची कारमधून तस्करी करणाऱ्या ५ जणांना राजगड पोलिसांनी खेड शिवापुर (ता. हवेली) येथील टोल नाक्यावरून आज सोमवारी (ता.१६) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. राजगड पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पुणे-सातारा महामार्गावर कर्त्यव्य बजावीत असताना, पोलिसांना पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने एक भरधाव वेगाने चाललेली कार (एच आर ५१ बि. सी. २४२४) आढळून आली. पोलिसांनी ती गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकांनी पोलीस पाहताच गाडी न थांबविता. भरधाव वेगाने पळून जाऊ लागले.
दरम्यान, कार न थांबविल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने कार थांबविली. पोलिसांनी का ताब्यात घेऊन तपासणी केली असता, कारच्या मागील डिकीत ८ किलो गांजा आढळला. पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना पडकले असून त्यांची नावे समजू शकली नाही. रायगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई न पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभाग नियत्रंणचे पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश ओव्हाळ, अमोल सूर्यवंशी, होमगार्ड पंकज शिंदे यांनी केली आहे.