दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कचरवाडी व सराटी य येथे अनुक्रमे सोमवारी (दि.५ ) व मंगळवारी (दि.६) रोजी झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५ लाख ६६ हजार ७२० रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना घडली आहे. या घटनेची तक्रार इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली आहे.
इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत बावडा पोलीस दूरक्षेत्रातील मौजे कचरवाडी कचरवाडी (ता. इंदापूर) येथील विलास सदाशिव गायकवाड यांच्या घरी दि. ५ रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरातील जिन्यामधून प्रवेश करून आतील खोलीचा दरवाजा उघडून कपाटातील ९५००० रुपयांची रोख रक्कम,२) १,५०,००० रू. सोन्याचे धातुचा साडेतीन तोळा वजनाचा गंठण,३) ७६,१२५ रूपये किंमतीचे १६.१३० ग्रॅमच्या अंगठ्या, ४)११,७७० रूपये किंमतीची २.४२१ ग्रॅम चे लेडीज अंगठी, ५)१६,४४० रूपये किंमतीचे २.८९३ ग्रॅम चे लेडीज टॉप्स,६) १३,६१० रूपये किंमतीचे २.४८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले,७)५०,००० रूपये किंमतीचे गळ्यातील ठुशी.
८) ३५,००० रुपयांची पाऊण तोळा वजनाचे सोन्याचे वेल,९) ४५,००० रूपये किंमतीचे कानातील दोन झुबे,१०) २०,००० रूपये किंमतीचे ४ सोन्याचे कळस,११)१८,००० रुपये किंमतीच्या सोन्याच्या रिंगा,१२) ५,७७५ रुपये किंमतीची सोन्याची बुगडी,१३) ५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे मनी, १४)८,००० रुपये किंमतीची सोन्याची नथ, १५) ५,००० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गुंड,१६) २,००० रुपये किमतीचे चांदीचे जोडवे असा एकूण ५ लाख ५६ हजार ७२० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
तर दुसरी घटना मंगळवारी ( दि.६) रोजी सराटी येथील रघुनाथ शिवाजी कोकाटे यांच्या घरामध्ये रात्री १ ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरी करुन घरातील १ हजार रुपये रोख रक्कमेसह ९ हजार रुपयांची कानातील सोन्याची कर्णफुले चोरून नेली.
सदर चोरी प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक भोईटे, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.