लोणी काळभोर (पुणे) : पुर्व हवेलीसह संपुर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या “सरपंच” पदासाठी सत्ताधारी नवपरीवर्तण पॅनेलचे प्रमुख चित्तरंजन त्रिंबक गायकवाड व विरोधी जनसेवा पॅनेलच्या उमेदवार कल्पना बाबासाहेब काळभोर या दोन प्रमुख उमेदवारांत थेट लढत होणार आहे. सरपंचपदाच्या लढतीत उतरलेले दोन्ही उमेदवार प्रबळ असल्याने, सरपंचपदाची निवडणुक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणुन नावलौकीक असणाऱ्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची सत्ता पुढील पाच वर्षासाठीही ताब्यात ठेवण्यासाठी विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व त्यांचे पती, भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजण त्रिंबक गायकवाड यांनी सर्वोतोपरी प्रयत्न चालवले आहेत.
तर दुसरीकडे विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांच्या मागील पाच वर्षापासुन ताब्यात असलेली ग्रामपंचाय, पुढील पाच वर्षासाठी कोणत्याही परीस्थीतीत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु पाटील काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे पुढील पाच वर्षासाठीचे सरपंचपद हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असुन, मागील निवडणुकीप्रमानेच यंदाही सरपंच हा थेट जनतेतुन निवडला जाणार आहे. सरपंचपदासाठी नवपरीवर्तन पॅनेलचे उमेदवार म्हणुन चित्तरंजन गायकवाड तर विरोधी जनसेवा पॅनेलच्या वतीने कदमवाकवस्तीचे विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या पत्नी, कल्पना काळभोर या दोन प्रमुख उमेदवारांच्यासह बिना तुषार काळभोर, अर्चना श्रीकांत कदम, राजेंद्र दत्तात्रेय हिंगणे पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मात्र आज (बुधवारी) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारीत वेळेत बिना तुषार काळभोर, अर्चना श्रीकांत कदम, राजेंद्र दत्तात्रेय हिंगणे या तीन जणांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने, चित्तरंजन गायकवाड व कल्पना काळभोर यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ठ झाले.
प्रभागनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे :-
प्रभाग क्रमांक १ – आकाश धनंजय काळभोर, सिमिता अंगदराव लोंढे, कोमल सुहास काळभोर (नवपरिवर्तन पॅनल), अर्चना हेमंत टिळेकर, नेहा बाबासाहेब चव्हाण, विशाल विठ्ठल गुजर (जनसेवा पॅनेल)
प्रभाग क्रमांक २ – बिना तुषार काळभोर, मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे, राजश्री उदय काळभोर, (नवपरिवर्तन पॅनल), रेश्मा नंदकुमार काळभोर, शीतल नितेश लोखंडे, स्मिता निलेश काळभोर (जनसेवा पॅनेल),
प्रभाग क्रमांक ३ – दीपक नवनाथ अढाळे, सुनंदा देविदास काळभोर (नवपरिवर्तन पॅनल), शहाजी कांतीलाल मिसाळ, संगीता राजाराम दळवी (जनसेवा पॅनेल),
प्रभाग क्रमांक ४ – नासीरखान मनुलाखान पठाण, अभिजित रामदास बडदे, रुपाली सतीश काळभोर (नवपरिवर्तन पॅनल), बिस्मिला शमी शेख, नंदू कैलास काळभोर, दत्तात्रय भिमराव वाघमारे (जनसेवा पॅनेल),
प्रभाग ५ – स्वप्नील शिवाजी कदम, अविनाश विजय बडदे, सोनाबाई अशोक शिंदे (नवपरिवर्तन पॅनल), स्मिता गुरुदत्त काळभोर, मयूर सुरेश कदम, अमित वसंत कदम (जनसेवा पॅनेल),
प्रभाग क्रमांक ६ – योगेश भाऊराव मिसाळ, सलीमा कलंदर पठाण, राणी प्रितम गायकवाड (नवपरिवर्तन पॅनल), श्रीकांत नारायण भिसे, अर्चना श्रीकांत कदम, मनीषा राजेश काळभोर, (जनसेवा पॅनेल), रुपाली अविनाश कोरे (स्वतंत्र)