पुणे : मार्केटयार्ड परिसरात गोळीबार करुन २८ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. १२) दुपारी घडली आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात पी.एम. अंगडिया यांचे कुरिअरचे कार्यालय आहे. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी पैसे तपासून पाहिले. पावणे बारा च्या सुमारास पाच ते सहा आरोपी ऑफिसमध्ये आले. त्यांनी दारातून पिस्टल दाखवली. त्यानंतर दुसऱ्या साथीदाराने त्यांना ढकलून कार्यालयाच्या बाहेर काढलं. कार्यालयात असलेल्या काचेवर गोळीबार करुन काच फोडली. त्यानंतर आरोपी पैसे घेऊन पळून गेले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपी पैसे घेऊन पळून गेले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे