श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये एक मिनी बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (ता.१४) सकाळी घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मंडीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मंडी तहसीलदार शहजाद लतीफ यांनी दिली आहे.
Jammu & Kashmir | A mini-bus accident occurred in the Sawjian area of Poonch. Army’s rescue operation is underway; 9 deaths reported, many injured shifted to a hospital in Mandi. Further details awaited: Mandi Tehsildar Shehzad Latif pic.twitter.com/NMFhtuK5lj
— ANI (@ANI) September 14, 2022
या घटनेची माहिती मिळताच,जखमींना वाचवण्यासाठी लष्कराचे सैन्य घटनास्थळी त्वरित दाखल झाले. लष्कराने बचावकार्य सुरू रून प्रवास्यांना बाहेर काढले आहे. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे.
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पुंछ दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना चांगले उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.