लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या तीन अल्पयीन बालकांसह ९ इसमांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तेजस संजय बधे (वय – १९ वर्षे रा. बोडके वस्ती, थेऊर, ता. हवेली) उदय सिद्धार्थ कांबळे (वय – १९ रा. भिल्ल वस्ती, चिंतामणी बेकरी थेऊर ते कोलवडी रोडवर, म्हतारी आई मंदिर रोड, थेऊर) प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय-१९ रा. ढवळे चौकसमोर, सखाराम नगर, नायगाव रोड, थेऊर), रोहित राजू जाधव (वय – २०, रा. महादेव मंदिर जवळ, लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय – २८, रा. कवडीपाट टोल नाका जवळ, चांदणी वस्ती, ता. हवेली) श्याम गुरप्पा जाधव (वय ४३ रा. शेवकर वस्ती, लक्ष्मीनगर, वानवडी, तसेच आणखी तीन अल्पवयीन बालक अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना पुढील तपासकामी लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक कारवाईचा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सोशल मिडिया वर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारे तसेच कोयता जवळ बाळगणारे इसमांना सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यांचेवर लोणीकाळभोर, हडपसर या पोलीस स्टेशनमध्ये भारताचा हत्यारबंदी कायदा अंर्तगत वरील आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.
सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांचे मार्गंदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
दरम्यान, गुन्हे शाखा यूनिट ६ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल म्हणाले, “सध्या कोयता घेउन दहशत पसरविण्याचे प्रकार सुरु असून त्यात अल्पवयीन बालकांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून आले आहे. म्हणून याची गंभीर दखल घेऊन यापुढे अल्पवयीन बालकांवर देखील कडक कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करणार आहे.”