पुणे : पुणे शहर, जिल्ह्यातील वानवडी, बंडगार्डन, हडपसर, लोणी काळभोर, इंदापूर, मुंढवा लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी व दुचाकी गाड्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अक्षयसिंग बिरुसिंग जुनी (वय- १९ रा. गल्ली नंबर ७, साई सोसायटी समोर, बिराजदारनगर, वेदवाडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १९ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ४ चारचाकी व ६ दुचाकी अशी १० वाहने जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानिवारी युनिट ५ चे पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, व पोलीस अंमलदार हद्दीत गस्त घालीत असताना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि पुणे पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार अक्षयसिंग जुनी वाहन चोरी करून त्याचा वापर घरफोडी चोरी करण्याकरीता करीत असून त्याचेकडे चोरीची वाहने आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अक्षयसिंग जुनी याला साई सोसायटी समोर, बिराजदारनगर, वेदवाडी, हडपसर, या ठीकांवरून एका दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याच्याकडे असलेली दुचाकी हि चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन चोरी करून त्यांचा वापर घरफोडी चो-या करण्याकरीता केला असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्याच्याकडून पोलिसांनी १९ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ४ चारचाकी व ६ दुचाकी अशी १० वाहने जप्त केली आहेत. तसेच त्याने पुणे शहर, जिल्ह्यातील वानवडी, बंडगार्डन, हडपसर, लोणी काळभोर, इंदापूर, मुंढवा लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहने चोरी केलायची कबुली पोलीसांना दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार, अकबर शेख, विनोद शिवले, प्रमोद टिळेकर, पांडुरंग कांबळे, रमेश साबळे, चेतन चव्हाण, अजय गायकवाड यांनी केली आहे.