पुणे : पत्नीच्या ”त्या” क्षणांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेश्याव्यवसायात करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी (ता. हवेली) येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार २०१६ ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत वडगाव शेरी, गोवा, बेंगलोर, सिंगापूर येथे घडला.
याप्रकरणी एका ३० वर्षीय पिडीत तरुणीने चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कोलकात्याची आहे. पिडीत तरुणी आणि आरोपीची एका पबमध्ये ओळख झाली होती. आरोपीने पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवले. तसेच ”त्या” क्षणांचा व्हिडिओ तयार केला.
त्यानंतर आरोपीने पिडीत तरुणीला तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वेश्याव्यवसाय करायला लावले. ग्राहक आणून किंमतही ठरवली. आणि त्या ग्राहकासोबत बळजबरीने गोवा, बेंगलोर, आणि सिंगापूर येथे शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले.
दरम्यान, पिडीत तरुणी पोलिसात तक्रार करेल म्हणून आरोपीने आळंदी येथे तिच्यासोबत लग्नदेखील केले. मात्र, त्यानंतरसुद्धा तिला वेश्याव्यवसाय करायला लावला. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.