वडूज : नडवळ (ता. खटाव जिल्हा सातारा) येथील एका तरुणाने स्वतःच्या राहत्या घरी अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता.९) दुपारच्या सुमारास केली आहे.
महेश दिनकर झेंडे (वय-३५, राहणार नडवळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती युवराज भिकू झेंडे यांनी पोलिसांना दिली. याबाबत वडूज पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार ए .एस. कदम करत आहेत.
दरम्यान, महेश झेंडे हा विवाहित होता. लाकूड कापणे, शेत मजुरी करीत होता.परंतु, महेश याने हे टोकाचे पाऊल का उचलले? कोणत्या कारणाने आत्महत्या केली ?याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा सुरू होती.